तुझ्या शोधात
जेवढी प्रेमळ तू    तेवढा रागीट मी   जेवढी समजूतदार तू   तेवढाच वेंधळा मी   कागदावर रेघोट्या उडतो  आणि त्यात ही तुलाच पाहतो  हळूच तुझा आवाज ऐकून   गुलमोहरा सारखा बहरून मी जातो   तुझ्यातच पाहतो मी संगिनी   आणि आयुष्यभराची सोबती   माझ्याशिवाय नको समजू   स्वतःला कधीही एकटी   नाही बोललीस कधीतरी   तर बेहाल होऊन जातो   असा गुरफटलो आहे तुझ्या प्रेमात   तुझ्या आठवणीत वाहून जातो   असेल आपल्यात अंतर लाख मैलांचे   पण नेहमी सोबत आहेस   या तुझ्या अशा बोलण्याने   दुःख सारे मी पचवून टाकतो